अमेरिका, युरोप आणि आफ्रिका खंडांत हाहा:कार !

0
352

न्यूयॉर्क,दि.१८(पीसीबी) : उत्तर भारतात महापुराने थैमान घातलेले असताना तिकडे अमेरिकेत उष्णतेची लाट आली आहे, कॅलिफोर्नियाच्या डेथ व्हॅलीमध्ये तापमान 54 डिग्री इतके उच्चतम नोंदले गेले आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया ते टेक्सासपर्यंतची जनता भीषण उकाड्याने हैराण झाली आहे.

मागील दोन आठवड्यापासून अमेरिकेत तापमान वाढत आहे. अमेरिकेतील एक तृतियांश जनता जवळपास 11 कोटी लोक या उकाड्याने प्रभावित झाले आहेत. रात्रीच्या वेळी सुद्धा रस्ते निर्मनुष्य आहेत.

अमेरिकेच्या नॅशनल ओशनिक अँड अॅटमॉस्फेरिक अॅडमिनिस्ट्रेशन (NOAA) ने या वर्षी जून-जुलै-ऑगस्ट दरम्यान अल निनो प्रवाहात बदल होऊन उष्णतावाढ य 90 टक्के होण्याची भीती व्यक्त केली आहे. वाढत्या कार्बनउत्सर्जनाला आत्तापासूनच आळा घातला नाही तर भविष्यात परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते असे नोआने म्हटले आहे.