जागेवर अतिक्रमण करत सुरक्षा रक्षकाला मारण्याची धमकी

0
472

तळवडे, दि. १७ जुलै (पीसीबी) – जागेवर जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमण करत सुरक्षा रक्षकाला मारण्याची धमकी दिली. ही घटना रविवारी (दि. 16) दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास त्रिवेणीनगर तळवडे येथे घडली.

सुरक्षा रक्षक शैलेश महादेव शिंदे (वय 24, रा. चिंचवड) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एमएच 12/क्यूएम 8662 क्रमांकाच्या जेसीबी चालक, एक महिला तसेच अन्य दहा ते बारा अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांचे मालक गंगाधर भालेकर यांच्या जागेमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते. रविवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास आरोपी महिला जेसीबी आणि अन्य दहा ते बारा अनोळखी लोकांना घेऊन आली. त्यांनी जागेभोवती लावलेले पत्र्याचे कंपाउंड पाडून फिर्यादीच्या अंगावर जेसीबी घालून फिर्यादीस जीवे मारण्याची धमकी दिली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.