बर्निंग कारचा थरार

0
706

हिंजवडी, दि. १५ (पीसीबी) : मुंबई-बंगळुरू महामार्गावरील मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर पुनावळे येथे शनिवारी (ता. १५) सकाळी नऊच्या सुमारास नागरिकांनी बर्निंग कारचा थरार अनुभवला. चालत्या व्हीआयपी मोटारीने अचानक पेट घेतला.
क्षणार्धात मोटार जळून खाक खाली. सुदैवाने मोटारीतील तीघां प्रवाशांना कुठलीही इजा झाली नाही. मात्र, माहमार्गावर तासभरवाहतूककोंडीचा सामना सर्वांना करावा लागला. याबाबत माहिती अशी, मर्सिडीज एमएच १२, एसक्यू १५५२ या क्रमांकाची मुंबईच्या दिशेने चाललेली मोटार पुनावळे येथील साई मिलेनिअम जवळ पोहचली असता या मोटारीच्या सायलेन्सरमधून आग निघत असल्याची बाब मागील मोटार चालकाच्या लक्षात आली त्याने समयसुचकता दाखवत मोटार चालकाच्या निदर्शनास ही बाब आणून दिली.

चालकानेही प्रसंगावधान राखत मोटार बाजूला घेत सर्वांना खाली उतरवल्याने मोठी दुर्घटना टळली. मोटारीतील सर्वजण खाली उतरताच मोटारीने मोठा पेट घेतला. बघता-बघता मोटार जळून खाक झाली. पोलिसांनी पाचारण केलेल्या अग्निशामक दलाच्या जवानांनी आग विझवली. वाकड वाहतूक विभागाने क्रेनच्या सहाय्याने मोटार रस्त्याच्या बाजूला करून घेत महामार्गावरील वाहतूक पूर्ववत केली. या आगीचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही. आगीने धुराचे मोठाले लोळ परिसरात पसरले होते तर बघ्यांच्याही मोठी गर्दी झाली होती.