प्रसिध्द अभिनेते रवींद्र महाजनी यांचे यांचे आकस्मित निधन

0
589

पिंपरी, दि. १५ (पीसीबी): मराठी चित्रपटसृष्टी गाजवणारे प्रसिध्द अभिनेते, हिंदी चित्रपटस्रुष्टीतील विनोद खन्ना सारखा देखणा चेहरा असलेले रवींद्र महाजनी यांचे यांचे आकस्मित निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. रविंद्र महाजनी यांच्या मागे नव्या पिढीतील अभिनेता गश्मिर महाजनी आहे.

ते मावळ तालुक्यातील आंबे येथे वास्तव्यास होते. एका बंद खोलीत शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास त्यांचा मृतदेह आढळला. त्यामुळे दुर्गंधी येत होती. उमद्या व्यक्तिमत्त्व असलेल्या या ज्येष्ठ अभिनेत्याच्या अकाली व दुर्देवी मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे. दोन ते तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. महाजनी यांच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती देण्यात आली.

१९७५ ते १९९० या काळात त्यांनी मराठी चित्रपटांमध्ये नायक म्हणून काम केले. महाजनी हे गेल्या काही दिवसांपासून आंबी येथे एका फ्लॅटमध्ये राहण्यासाठी आले होते. शुक्रवारी त्यांच्या फ्लॅटमधून दुर्गंधी आल्याने नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन फ्लॅटचा दरवाजा तोडला त्यावेळी महाजनी यांचा मृतदेह आढळून आला.