रिलायन्स मार्ट मधील कामगारांनी केला नऊ लाखांचा अपहार

0
648

रहाटणी, दि. १४ जुलै (पीसीबी) – रहाटणी येथील रिलायन्स मार्ट मध्ये काम करणाऱ्या कामगारांनी तांत्रिक छेडछाड करून नऊ लाखांचा अपहार केला. हा प्रकार एक सप्टेंबर 2022 ते 18 जून 2023 या कालावधीत घडला.

अभिजीत राजू मिरेकर (वय 27, रा. जनवाडी, पुणे) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विजय तुकाराम चकाले (रा. थेरगाव), रोहित रघुनाथ कांबळे (वय 20, रा. नखाते वस्ती, रहाटणी), प्रशांत अच्युत पांचाळ (वय 19, रा. थेरगाव), संजीव पाठक (वय 39, रा. नखाते वस्ती, रहाटणी) या चौघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यासह शिवकुमार सुरेश लोणार (वय 23, रा. नखाते वस्ती, रहाटणी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे रहाटणी येथील रिलायन्स मार्ट या दुकानात काम करीत होते. त्यांनी दुकानातील सिस्टीम मध्ये ट्रेनिंग मोड सुरु केला. तसेच दुकानातील सीसीटीव्ही फुटेजचा डीव्हीआर बंद केला. त्या आधारे आरोपींनी दुकानातील नऊ लाख 745 रुपयांचा अपहार केला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.