अजितदादांना अर्थ, वळसेंकडे सहकार खाते

0
354

मुंबई, दि. १४ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार हे भाजप प्रणित शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होत, उपमुख्यमंत्री पदावर विराजमान झाले. हा एकनाथ शिंदेंच्या आमदारांसाठी धक्का देणारा निर्णय होता. मात्र मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपात घोडं अडल होतं ते अर्थखातं राष्ट्रवादीला सोडायला हवे का यावरून, म्हणूनच शिंदे गटाच्या आमदारांमध्ये अस्वस्थता असल्याची चर्चा होती. दरम्यान, शिंदे गटातील अनेक आमदारांचा रोष अजून कायम असल्याने आगामी काळात केव्हाही त्याचा उद्रेक होऊ शकतो, असेही सांगण्यात येते.

मात्र आता अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी अमित शाहांच्या भेटीनंतर अर्थखात्याचं तिढा सुटल्याचं असं दिसून येत आहे. अजित पवार यांना अर्थ खातं देण्यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती, एका मराठी वृत्तवाहिनेने दिली आहे. अजित पवारांना अर्थखात्यासोबतच, दिलीप वळसे पाटील यांना सहकार खातंही मिळाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेलं अर्थ खातं अजित पवारांकडे जाणार हे जवळपास निश्चित मानले जाते.

राष्ट्रवादीकडे कोणती खाती असणार ?

अर्थ खातं आणि सहकार खात्याशिवाया अजित पवार गटाकडे महिला आणि बाल विकास मंत्रालय, युवक कल्याण मंत्रालय, सामाजिक न्याय मंत्रालय ही खाती राष्ट्रवादीकडे राहण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्याकडे अर्थ खातं देण्यावरून शिंदेच्या शिवसेनेचा विरोध असल्याची चर्चा होती. आता अर्थ आणि सहकार हे महत्त्वाची खाती अजित पवारांकडे गेले तर एकनाथ शिंदे गटाची काय भूमिका असेल, त्यांचा विरोध काय राहिल का? हे पाहणे महत्त्वाचे राहणार आहे.

राष्ट्रवादीच्या खात्यांची संभाव्य यादी –
अर्थ – अजित पवार
कृषी- छगन भुजबळ
सहकार- दिलीप वळसे पाटील
परिवहन- धर्मराव अत्राम
सामाजिक न्याय – धनंजय मुंडे
अन्न नागरी पुरवठा – अनिल भाईदास पाटील
महिला बाल कल्याण – अदिती तटकरे क्रीडा
अल्पसंख्यांक – हसन मुश्रीफ