स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत ‘तारीख पे तारीख’चा सिलसिला

0
296

नवी दिल्ली, दि. १४ (पीसीबी) – राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयातील ओबीसी आरक्षणाबाबतची नियोजीत सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. आता ही सुनावणी १८ जुलै रोजी होण्याची शक्यता आहे. सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यासमोर ही सुनावणी होणार आहे. आज (शुक्रवारी) ही सुनावणी होणार होती.

गेल्या अनेक दिवसांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाबाबत ‘तारीख पे तारीख’चा सिलसिला सुरू आहे. गेल्या वर्षभरापासून याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झालेली नाही. अशातच आज होणारी सुनावणीही लांबणीवर पडली आहे. आता पुढची सुनावणी १८ जुलैला होईल का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या संपूर्ण प्रकरणाची उत्सुकता ऑगस्ट २०२२ पासून महाराष्ट्राला आहे. या प्रकरणा संदर्भात रोज नव्या तारखा समोर येत आहेत. या एका याचिकेवर २३ महानगरपालिका, २५ जिल्हा परिषदा आणि २०७ नगरपालिका, पंचायत समित्यांचं भवितव्य अवलंबून असणार आहे. याव्यतिरिक्त ९२ नगरपरिषदांमधल्या ओबीसी राजकीय आरक्षणाचाही मुद्दा अद्याप प्रलंबित आहे.