सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धेचे आयोजन

0
378

पिंपरी, दि. १४ जुलै (पीसीबी) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्रिडा विभागाच्या वतीने शासकीय जिल्हास्तर शालेय क्रिडा स्पर्धा अंतर्गत सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धेचे आयोजन १५ ते ३१ जुलै या कालावधीत पिंपळे सौदागर येथील स्वर्गीय बाळासाहेब कुंजीर क्रिडा संकुल येथे करण्यात आले आहे.

सन २००४ मध्ये महाराष्ट्र शासनाकडून पिंपरी चिंचवड महापालिकेस जिल्हा क्रिडा स्पर्धेकरिता जिल्हा दर्जा प्राप्त झाला आहे. दरवर्षी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यावर्षीही शासकीय जिल्हास्तर शालेय क्रिडा स्पर्धा २०२३-२४ अंतर्गत सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धेचे आयोजन वरील नमुद कालावधीत पिंपळे सौदागर येथील स्वर्गीय बाळासाहेब कुंजीर क्रिडा संकुल येथे करण्यात येणार असल्याची माहिती क्रिडा विभागाचे उप आयुक्त मनोज लोणकर यांनी दिली.