बेकायदेशीर रीत्या शाळा सुरू केल्याप्रकरणी शाळेच्या संचालक व मुख्याध्यापकांवर गुन्हा दाखल

0
274

हिंजवडी दि. १३ (पीसीबी) – शासनाने नेमुण दिलेल्या कागदपत्रांची व अटींची पूर्तता न करता बेकायदेशीर रित्या माण येथील ओझरकरवाडी येथे रूडिमेड इंटरनॅशनल स्कूल सुरू करण्यात आले. हा धक्कादायक प्रकार उघडकीस येताच हिंजवडी पोलीस ठाण्यात शाळेचे संचालक व मुख्याध्यापक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी केंद्रप्रमुख सुरेश साबळे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात बुधवारी ( दि.12) फिर्याद दिली आहे. यावरून पोलिसांनी शाळेचे मुख्याध्यापक विनीत भारद्वाज व एक महिला आरोपी यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओझरकरवाडी येथे जानेवारी 2023 पासून रुडीमेट इंटरनॅशनल स्कूल सुरू करण्यात आले. यावेळी शासनाने नेमून दिलेल्या नियम व अटी तसेच कागदपत्रांची कोणतीही पूर्तता शाळेने केलेली नव्हती. असे असताना देखील बेकायदेशीर रित्या शाळा सुरू करत भरमसाठ फीस घेत विद्यार्थ्यांना ऍडमिशन देण्यात आले. या अडमिशनसाठी इतर शाळांकडून बेकायदेशीर रित्या शाळांचा दाखला घेतला गेला, तसेच काही विद्यार्थ्यांना शाळा सोडण्याचे दाखले देखील देण्यात आले , अशा प्रकारे कोणताही अधिकृत अधिकार नसताना शाळा प्रशासनाने महसूल बुडवून शासनाची पालकांची व विद्यार्थ्यांची फसवणूक केली आहे. यावरून हिंजवडी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.