निगडी,दि.१३(पीसीबी) – कविरत्न उपाध्याय प्रवर श्री केवलमुनी महाराज यांच्या जन्मजयंती निमित्त” भगवान पार्श्वनाथ अणुष्ठान” चे आयोजन रविवार दि १६ जुलै २०२३ रोजी सकाळी ८.३० संपन्न होणार आहे.
चार्तुमासा निमित्त निगडी प्राधिकरणातील पाटीदार भवन येथे दक्षिण चंद्रिका प.पू डॉ. संयमलताजी ,डॉ अमितप्रज्ञाजी, प.पू कमलप्रज्ञाजी प.पू सौरभ प्रज्ञाजी येथे विराजमान आहे. या जप अनुष्ठान मध्ये१००८ जोडपे सहभागी होत आहेत. विशेष म्हणजे या अनुष्ठानासाठी प.पू डॉ. संयमलताजी यांचे मार्गदर्शन मिळत आहे,व त्यासाठी आशीर्वाद प्राप्त होणार आहेत. संघाच्या वतीने या कार्यक्रमाची, जय्यत तयारी सुरु आहे.
संघाच्या वतीने सर्व जैन बांधवांनी मोठ्या संख्येने या विधीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.









































