मनसेचे जिल्हा उपाध्यक्षाला ३ लाख रुपये महिना खंडणी प्रकरणातून अटक

0
491

पेण, दि. १३ (पीसीबी) – पेण येथील मुद्रांक विक्रेते हबीब खोत यांच्या मुद्रांक विक्रीच्या व्यवसायाविरुध्द तक्रार न करण्यासाठी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संदिप ठाकूर यांनी फिर्यादी यांच्याकडे ३ लाख रुपये व प्रत्येकी ४० हजार रुपये महिना खंडणीची मागणी करून धमकी देण्यात आली.यामध्ये तडजोडअंती २ लाख रुपये देण्याचे ठरले त्यानुसार दि.११ रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी यांच्याकडून उर्वरित दिड लाख रुपये स्वीकारत असताना आरोपी मनसे जिल्हा उपाध्यक्ष संदीप ठाकूर याला पेण पोलिसांनी ताब्यात घेऊन खंडणी प्रकरणी अटक केली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की मागच्या काही दिवसांपूर्वी पेण सेतू कार्यालयात जास्त प्रमाणात पैसे घेऊन नागरीकांची लूट करण्यात येते याबाबत मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप ठाकूर यांनी आवाज उठून सोशल मीडियावर सहानुभूती मिळवली होती. मात्र ही सहानुभूती फक्त आपल्या फायद्या करिता वापरून सदर फिर्यादी हबीब खोत याच्याकडे आरोपी संदीप ठाकूर, रफीक तडवी व शालोम पेणकर यांनी मुद्रांक विक्रीच्या व्यवसायाविरुध्द तक्रार न करण्यासाठी सुरूवातीस तीन लाख रुपये व प्रत्येक महीन्यास ४० हजार रुपयाची खंडणी मागितली याबाबत तडजोडीअंती २ लाख रूपये खंडणीची मागणी ठरली असता ७ जुलै रोजी आरोपी संदीप ठाकूर यांचेवतीने आलेल्या अनोळखी इसम आरोपी याने पहिले ५० हजार रूपये स्विकारले व त्यानंतर उर्वरित दिड लाख रुपये दि.११ रोजी अपना बाजार पेण नाका येथे स्वीकारताना आरोपी संदिप ठाकूर यासह तीन जणांना अटक करून त्यांच्याविरोधात गुन्हा रजि.नं. २०९/ २०२३ भा.दं.वि.स.कलम ३८६, ५०६, ३४ प्रमाणे अटक केली आहे. याबाबतचा अधिक तपास डिवायएसपी शिवाजी फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक देवेंद्र पोळ करीत आहेत.

मनसेच्या नावावर अनेक दुकानदार, हातगाडीवाले तसेच अधिकारी वर्ग यांच्याकडे दमबाजी करत खंडणी वसूल करून आपली पोट भरणा-या अशा स्वयंघोषित खंडणीखोर मनसे पदाधिकाऱ्यांना पेण पोलिसांनी अटक केल्याने नागरिकांकडून पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सदर खंडणी प्रकरणात आरोपी असणारे मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप ठाकूर यांच्यासह अन्य तीन आरोपींना पेण न्यायालयात हजर केले असता चारही आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.