मेडिकल इमर्जन्सीच्या बहाण्याने घेतलेले दीड लाख रुपये परत न करता मित्राची फसवणूक

0
613

चिंचवड,दि १२ (पीसीबी)- मेडिकल इमर्जन्सी आली असल्याचे सांगत मित्राकडून दीड लाख रुपये घेतले. ते पैसे मित्राला परत न देता फसवणूक केली. हा प्रकार जून 2022 मध्ये चापेकर चौक, चिंचवडगाव येथे घडला.

विकास मामन चंद्रगोयल (वय 41, रा. वाकड) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सागर मारोती सूर्यवंशी (वय 45, रा. कोरेगाव पार्क, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे मित्र आहेत. आरोपी सागर याने त्याला मेडिकल इमर्जन्सी आली असल्याचे कारण सांगून त्याने फिर्यादीकडे पाच लाख रुपये मागितले. मात्र फिर्यादी यांच्याकडे एवढे पैसे नसल्याने त्यांनी दीड लाख रुपये सागर याला दिले. त्यांनतर ते पैसे देण्यासाठी सागर याने टाळाटाळ करत फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.