अॅमेझॉन कंपनीच्या मालाचा अपहार; वाहन चालकावर गुन्हा

0
500

महाळुंगे,दि १२ (पीसीबी)- वाहन चालकाने एका गोडाऊन मधून ट्रक मध्ये भरलेला माल दुसऱ्या गोडाऊन मध्ये पोहोचवला नाही. याप्रकरणी ट्रक चालकाच्या विरोधात अपहार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 4 मार्च ते 12 मार्च आणि 18 मार्च या कालावधीत निगडी येथील गोडाऊन ते महाळुंगे येथील गोडाऊन दरम्यान घडला आहे.

मोबीन मनीर अन्सारी (वय 43, रा. झारखंड) असे गुन्हा दाखल झालेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. याप्रकरणी कंपनीच्या वतीने एका महिलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मोबीन हा अॅमेझॉन कंपनीच्या ट्रकवर चालक म्हणून काम करतो. त्याने दुर्गानगर निगडी येथील गोडाऊन मधून 91 हजार 100 रुपये किमतीचे फोल्डिंग प्लास्टिकचे ट्रे ट्रकमध्ये भरले. ते ट्रे महाळुंगे येथील गोडाऊन मध्ये पोहोच करायचे होते. मात्र आरोपीने ते ट्रे महाळुंगे येथील कंपनीत पोहोच न करता त्याचा अपहार केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.