सेफ्टी डोअरचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने पळवले

0
216

सांगवी, दि १२ (पीसीबी)- जुनी सांगवी येथे एका फ्लॅटचे सेफ्टी डोअरचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने पळवले. ही घटना मंगळवारी (दि. 11) पहाटे घडली.

किरण सचिन गवारे (वय 37, रा. जुनी सांगवी) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा फ्लॅट बंद असताना चोराने लोखंडी ग्रीलच्या दरवाज्याचे कुलूप तोडून आतील दरवाजाचे कुलूप तोडले व घरात प्रवेश करत घरातील 70 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.