चऱ्होली,दि १२ (पीसीबी)- किरकोळ कारणावरून चऱ्होली येथे दोन गटात हाणामारी झाली. याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही घटना मंगळवारी (दि. 11) पहाटे सव्वा एक वाजताच्या सुमारास घडली.
मंगेश हयप्पा मटपती (वय 35 रा. चऱ्होली) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विनोद विठ्ठल पाथरुट (वय 26 रा. लोहगाव), जिवन विठ्ठल पाथरुट (वय 27), महिंद्र बाबुराव पवार (वय 30),आदित्य राजेश गुप्ता (वय 21), साहील मोहन मिसाळ (वय 23), अवनिश दिनेश उपाध्याय (वय 21) अशी टक आरोपींची नावे असून इतर 12 ते 14 जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे मित्र हे जेवून परतत असताना त्यांना पाच ते सहा जण घोळका करुन उभराल्याचे दिसले. यावेळी फिर्यादींना शंका आल्याने त्यांनी आरोपींना हाटकले. याचा राग येवून आरोपींनी शिवीगाळ करत मारहाण केली. यावेळी गेटवर उभ्या असलेल्या सुरक्षा रक्षकाला हे कोण आहेत अशी फिर्यादी यांनी विचारले असता त्याने ही धक्काबुक्की केली. थोड्यावेळात दुचाकीवरून 15 ते 20 जण सेक्युरीटी गार्डच्या गणवेशात आले व त्यांनी फिर्यादीला लोखडी पाईप, बांबू काठ्या, लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण करत गंभीर जखमी केले तसेच जिवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
याच्या परस्पर विरोधात विनोद विठ्ठल पाथरुट यांनी फिर्याद दिली असून त्यानुसार स्वप्निल देवकर व मंगेश मटपती व त्य़ांचा आणखी एक साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या फिर्यादीत म्हटले आहे की, गेटवर बांडणे झाल्याचे समजताच फिर्यादी व त्यांचे साथीदार भांडणे सोडविण्यासाठी गेले असता आरोपींनी शिवीगाळ व दमदाटी करत लाकडी दांडक्याने, दगडाने व विटे मारून फिर्यादी व त्यांच्या भावाला जखमी केले. दिघी पोलीस तपास करीत आहेत.










































