पूर्णानगर मधून सव्वा लाखांचे बांधकाम साहित्य चोरीला

0
348

चिखली, दि.११(पीसीबी) – पूर्णानगर चिखली येथून चौघांनी एक लाख 34 हजार रुपयांचे बांधकामाचे साहित्य चोरून नेले. ही घटना सोमवारी (दि. 10) सकाळी उघडकीस आली.

सचिन प्रवीणभाई पटेल (वय 29, रा. मोशी प्राधिकरण) यांनी याप्रारणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चार अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी पूर्णानगर येथे ठेवलेले एक लाख 34 हजार 370 रुपये किमतीचे बांधकामाचे साहित्य चोरीला गेले. सोमवारी पहाटेच्या वेळी दोन रिक्षांमधून चार अनोळखी चोरटे आले. त्यांनी हे साहित्य रिक्षात भरून नेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.