२०१७ ला शरद पवार यांच्यामुळेच महापालिकेतील राष्ट्रवादीची सत्ता गेली…

0
532

पिंपरी, दि. ११ (पीसीबी) – महापालिका निवडणुकिला २०१७ ला स्वतः शरद पवारांनी नगरसेवकांना तिकीट वाटप केल्याने राष्ट्रवादीची महानगरपालिकेतील सत्ता गेली, असा गंभीर आणि खळबळजनक आरोप राष्ट्रवादीचे अजित पवार समर्थक आमदार अण्णा बनसोडे यांनी केला आहे.

राज्याच्या राजकारणात दहा दिवसांपूर्वी मोठी उलथापालथ झाली. राष्ट्रवादीच्या ४० आमदारांसह अजितदादा भाजप सोबत मंत्रीमंडळात सामिल झाले. त्यावेळी आमदार बनसोडे यांनीही अजितदादांना समर्थन दिले. त्याबाबत माध्यमांशी बोलताना त्यांनी अजित पवार यांच्यामुळेच शहरा राष्ट्रवादी असल्याचा उल्लेख केला आणि थोरले पवार यांच्यावर दुगान्या झाडल्या. पिंपरी चिंचवड महापालिकेवर असलेली सत्ता आणि शहरात पक्षाच्या झालेल्या अवस्थेला शरद पवार कारणीभुत असल्याचा धक्कादायक खुलासा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटर्तीय राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी केला आहे. नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादीच्या शपथ विधी सोहळ्यात 9 आमदारांनी मंत्री पदाची शपथ घेतली त्यामध्ये अण्णा बनसोडे यांची वर्णी न लागल्याने ते नाराज असल्याची चर्चा होती मात्र आपण नाराज नाही आणि कायम अजित पवार यांच्या सोबतच आहोत , आणि पक्षाच चिन्ह आणि नाव देखील अजित पवार यांच्याकडेच राहील असा असं स्पष्टीकरण देतानाच पुढील काळात पिंपरी चिंचवड महापालिकेवर राष्ट्र वादीची सत्ता येईल आणि तीनही मतदार संघात आमचेच आमदार असतील असा दावा बनसोडे यांनी केलाय ,इतकंच नाहीतर कधीकाळी पिंपरी चिंचवड हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता मात्र 2019 च्यां विधानसभा निवडणुकीत भोसरी आणि चिंचवड मतदार संघात एकही उमेदवार मिळाला नव्हता आणि 2017 मध्ये महापालिकेवरील सत्ता देखील या मागची कारणे काय असा प्रश्न विचारला असता या आधीच्या निवडणुकीत शरद पवार तिकीट द्यायचे आणि त्यामुळेच अशी पक्षाची अशी परिस्थिती झाल्याचं बनसोडे म्हणाले