पोलिसात तक्रार केली म्हणून महिलेस मारहाण

0
378

निगडी, दि. ५ जुलै (पीसीबी) – पोलिसात तक्रार दिल्याच्या कारणावरून एका महिलेस भर रस्त्यात मारहाण करण्यात आली. तसेच महिलेकडे प्रेमाची मागणी करत प्रेम संबंध न ठेवल्यास महिलेला आणि तिच्या पतीला पाहून घेण्याची धमकी दिली. ही घटना जानेवारी ते 3 जुलै या कालावधीत निगडी येथे घडली.

जुनेद शेख (वय 36, रा. दत्तवाडी, आकुर्डी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पिडीत महिलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जनुेद हा महिलेचा वारंवार पाठलाग करून त्रास देत असे. यामुळे त्या महिलेने याबाबत पोलिसात तक्रार दिली. या कारणावरून संतापलेल्या आरोपीने पिडित महिलेला रस्त्यात अडवून तू माझी पोलिसात तक्रार का केली म्हणून तिचा हात परगळला. तिच्या कानावर, मानेवर जोरजोराने थप्पड व बुक्‍कीने मारहाण केली. तसेच त्यानंतरही आरोपीने वेळोवेळी दुचाकीवरून पिडित तरुणीचा पाठलाग करून “तू माझी झाली नाहीस तर तुला आणि तुझ्या पतीला पाहून घेईल, अशी धमकी दिली. तसेच पिडित तरुणीला मोबाइलवर वाईट मेसेजेस पाठविले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.