तरुणाकडून दोन पिस्टल 16 काडतुसे जप्त

0
208

वडगाव, दि. ४ (पीसीबी) – तरुणाकडून दरोडा विरोधी पथकाने दोन पिस्टल आणि 16 जिवंत काडतुसे असा शस्त्रसाठा जप्त केला आहे. ही कारवाई दरोडा विरोधी पथकाने सोमवारी (दि. 3) सायंकाळी चार वाजता करण्यात आली.

सुधीर अनिल परदेशी (वय 25, रा. केशवनगर, वडगाव मावळ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी दरोडा विरोधी पथकातील पोलीस अंमलदार सुमित देवकर यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुधीर परदेशी याच्याकडून दरोडा विरोधी पथकाने 70 हजार रुपयांच्या दोन लोखंडी पिस्टल आणि आठ हजारांची 16 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. पिस्टल बाळगण्याचा कोणताही परवाना नसताना त्याने ही शस्त्रे बाळगली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.