नागरिकांची सुरक्षा हि सर्वतोपरी, कोकणे चौक परिसर वाहतूक कोंडीतुन मुक्त करण्यासाठी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांचा पाहणी दौरा

0
264

पिंपरी, दि. ३ (पीसीबी) – नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी वाहतूक विभाग प्रमुख आणि पालिका BRTS अधिकारी सोबत कोकणे चौक येथे सतत होणारी वाहतूक कोंडी संदर्भात उपाययोजना करण्याबाबत पाहणी केली.

कोकणे चौक याठिकाणी वाहतुक कोंडीमुळे होणाऱ्या अपघाताचे प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे . एक लोकप्रतिनिधी या नात्याने अश्या समस्या वर आवश्यक तो तोडगा लवकरात लवकर काढणे प्राथमिकता असल्याने नगरसेवक श्री शत्रुघ्न काटे यांनी तातडीने वाहतूक आणि पालिका प्रशासन सोबत कोकणे चौक याठिकाणी पाहणी केली . नागरिकांची सुरक्षा हि सर्वतोपरी असल्याने या वाहतूक कोंडीतून नागरिकांना मोकळा श्वास घेता यावा म्हणून कोकणे चौक परिसर वाहतूक कोंडीतून मुक्त करण्याचा निर्धार नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी केला आहे तसेच नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी नागरिकांनी आव्हाहन केले आहि के या समस्येवर एक पर्याय म्हणून नागरिकांनी जास्तीत जास्त प्रमाणात शासकीय वाहतूक यंत्रणेचा (पब्लिक ट्रान्सपोर्ट ) वापर करावा जेणेकरून रस्त्यावरील वाहनांची गर्दी होणार नाही.

कोकणे चौक याठिकाणी सतत होणारी वाहतूक कोंडी ही चिंतेची बाब असून यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी अधिकारी सोबत केलेल्या पाहणीवेळी सकारात्मक दृष्टीने चर्चा झाली असून याबाबत आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित अधिकारी यांना दिले आहे.

या पाहणी दरम्यान नगरसेवक शत्रुघ्न (बापु)काटे , नगरसेवक विठ्ठल (नाना) काटे , वाहतूक निरीक्षक गोकुळे साहेब , साळुंखे साहेब , BRTS कनिष्ठ अभियंता अमोल पाचगणे आणि इतर अधिकारी वर्ग उपस्थित होते.