पिंपरी दि.२७ – महाराष्ट्र राज्यातील अनेक मोठमोठे गुंतवणूक व कंपन्या, उद्योग या गुजरात, कर्नाटक सह इतर राज्यांमध्ये गेला यामुळे महाराष्ट्र १ लाख ८० हजार कोटींच्या गुंतवनुकीला मुकला यावर टीका होत असल्यामुळे उद्योग मंत्री उदय सामंत आपण १८ नोव्हेंबर २०२२ रोजी पिंपरी चिंचवड शहरातील मेळाव्यामध्ये राज्यातील जे उद्योग बाहेर गेले आहेत त्याबाबत श्वेत पत्रिका काढणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे प्रकल्प बाहेर गेल्याचे जिव्हारी लागलेल्या बेरोजगाराच्या समोर सत्य बाहेर येण्याची आशा निर्माण झालेली होती त्याचे स्वागत तरुणांनी केले मात्र सात महिने उलटून गेले तरी अजूनही श्वेतपत्रिका काढण्यात आलेली नाही म्हणून उद्योगमंत्री सामंत साहेब त्या श्वेतपत्रिकेचं काय झाले हो ..? असे बेरोजगार विचारात आहेत त्याला उत्तर द्या अन्यथा राजीनामा द्या अशी मागणी कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी केली आहे .
महाराष्ट्र राज्यातून वेदांता फॉक्सकाँन , बल्क ड्रग पार्क,टाटा एअरबस, असे अनेक प्रकल्प राज्याबाहेर गेले आणि १ लाख ८० हजार कोटींच्या गुंतवणूकिला महाराष्ट्र मुकला आहे. पिंपरी चिंचवड शहरापासून अगदी जवळ असणाऱ्या तळेगाव येथे वेदांता फॉक्सकाँन हा प्रकल्प येणार असल्याची घोषणा महाविकास आघाडीने करून त्या जागेची पाहणी करून निश्चित करण्यात आली मात्र कोरोनाच्या कालावधीनंतर परिस्थिती बदलली. तळेगावला येणाऱ्या प्रकल्पामुळे सुमारे २ लाख बेरोजगारांच्या हाताला काम मिळणार होते म्हणून पुणे जिल्ह्यातील हाताला काम नसलेल्या बेरोजगारांना आशेचा किरण निर्माण झालेला होता , मात्र सत्ता बदल झाल्याने शिंदे – फडणवीस सरकारच्या कालावधीमध्ये हा प्रकल्प गुजरातला गेला त्यावर राज्यातील सत्ताधारी हे काही करू शकले नाहीत यावर उद्योगमंत्री म्हणून आपण खुलासा करावा अशी मागणी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, नॅशनलिस्ट ट्रेड युनियन फेडरेशन, कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र तर्फे करण्यात आली आहे .आपण नोव्हेंबर महिन्यामध्ये दिल्ली येथील आंतरराष्ट्रीय व्यापारी मेळाव्यात येत्या काही दिवसात ३० ते ४० हजार कोटीची गुंतवणूक महाराष्ट्रात होईल असेही वक्तव्य केले होते त्याबाबत ही आपण कोणते प्रकल्प सुरू झाले याबाबत हे आपण खुलासा केला तर राज्यातील जनतेला अवगत होईल .केंद्र व राज्य शासन सरकारच्या एखाद्या महत्त्वाच्या विषयावर तयार केलेले अधिकृत निवेदन म्हणजे श्वेतपत्रिका होय १९४० पासून भारतामध्ये ही प्रथा आहे. श्वेतपत्रिकेला महत्त्व आहे म्हणून वेदांत फॉक्सकाँन व इतर उद्योग जे महाराष्ट्र राज्य बाहेर गेले त्यानंतर आपण पिंपरी चिंचवड शहरात अनेकवेळा आला त्यावेळी श्वेतपत्रिका बाबत जाहीर कराल अशी अपेक्षा होती मात्र निराशा झाली आहे .उद्योगाबाबत उलट सुलट चर्चा आहेत यातून सत्य बाहेर येण्यासाठी केलेली घोषणा खरी ठरवण्यासाठी श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्योग मंत्री उदय सामंत यांचेकडे केली आहे .