बेकायदेशीरपणे कत्तल करत मांसाची वाहतूक केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा

0
199

पिंपरी, दि.२६ (पीसीबी)- बेकायदेशीर पणे म्हशीची कत्तल करत मांस वाहतूक केल्याप्रकरणी तीघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार रविवारी (दि.25) देहुरोड जवळील मामुर्डी येथे घडला आहे.

हसन मोहमद कुरेशी (वय 62 रा. मामुर्डी), ईरफान हसन कुरेशी, रिक्षा चालक शाकीर अहमद सय्यद (वय 35 रा.देहुरोड) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,हसन व त्याचा मुलगा ईरफान हे कोणताही परवाना नसताना कत्तलीचा व्यवसाय करत होते. तर शाकीर हा त्यांनी कत्तल केलेल्या म्हशीच्या मांसाचे वाहतूक केल्या प्रकरणी तिघांवरही गुन्हा दाखल केला असून सीआरपीसी 41(अ) (1) नुसार नोटीस बजावली आहे. देहुरोड पोलीस पुढील तपास करत आहेत.