जेसीबी ऑपरेटरला मारहाण करत दोघांनी लुटले

0
408

बोपखेल, दि. २६ जून (पीसीबी) – जेसीबी ऑपरेटरला दोघांनी मारहाण करत लुटले हा प्रकार रविवारी रात्री बोपखेल येथे घडला.याप्रकरणी राकेश बाबू तेजी (वय 46 रा चऱ्होली ) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून राहुल मदन सोदे (वय 24) भैय्या प्रकाश डोंगरे (वय 25) दोघे राहणार बोपखेल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे घरी जात असताना आरोपींनी त्यांना रस्त्यात अडवले व त्यांची खिशात तपासत होते. यावेळी फिर्यादीने त्यांना विरोध केला असता राहुल याने एका लोखंडी वस्तूने फिर्यादीच्या डोक्यात मारले, यावेळी फिरलेली खाली पडले व त्यांच्या डोक्यातून रक्त येऊ लागले. तेवढ्यात आरोपीने त्यांच्या खिशातील तेराशे रुपये काढून घेत हातातील मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला, परंतु फिर्यादी यांनी आरडा ओरड केल्याने ते त्यांना तेथे सोडून पळून गेले. यावरून भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.