दृष्टिहीन विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती वितरण सोहळा मान्यवरांच्या हस्ते संपन्न

0
513

पुणे, दि. २६ जून (पीसीबी) – द ब्लाइंड वेल्थ ऑर्गनायझेशन या संस्थेच्या वतीने शनिवारी नवीन पत्रकार भवन येथे 120 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 1800 रुपयांचे धनादेश देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले यावेळी कार्यक्रमास पद्मविभूषण डॉक्टर संचेती नामांकित उद्योजक कोहिनूर ग्रुपचे कृष्णकांत गोयल युवराज गाढवे डॉक्टर शालिग्राम भंडारी हे मान्यवर उपस्थित होते.

यावेळी डॉक्टर संचेती यांनी विद्यार्थ्यांचे कमालीचे कौतुक केले आणि विद्यार्थ्यांनी यशाला भारावून न जाता आपण असेच यश संपादन करत राहावे असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व हा एक माझ्या दृष्टीने अविस्मरणीय क्षण असल्याचे आपल्या मनोगतात व्यक्त केले तर कोहिनूर ग्रुपचे संचालक कृष्णकुमार गोयल यांनी देखील विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या या संस्थेचे कार्य मी गेल्या पंधरा वर्षापासून पहात आहे आणि त्यांच्या प्रत्येक उपक्रमांना मी नेहमीच मदत करतो आजही संस्थेच्या वतीने जी घेण्यात येणाऱ्या जागे करीता स्टॅम्प ड्युटीचा खर्च स्वतः कोहिनूर ग्रुप करेल अशी ग्वाही दिली तसेच डॉक्टर शालिग्राम भंडारी यांनी देखील विद्यार्थ्यांना उद्बोधन केले कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून करण्यात आली त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष अरुण भारस्कर यांनी संस्थेचा परिचय मान्यवरांना करून दिला तर कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता संचालक दिनेश मुसळे व नामदेव बारापात्रे डॉक्टर दिपाली दिपाली ईश्वर झवर् व लायन्स क्लब तळेगाव यांचे विशेष योगदान मिळाले