आळंंदी, दि. २४ (पीसीबी) – लोकसभेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी देशातील प्रमुख १७ राजकीय पक्षांची शुक्रवारी (ता. २३) पाटणा येथे बैठक झाली. त्यात त्यांनी एकीचा निर्धार केला. या बैठकीती भाजपकडून मात्र खिल्ली उडवली जात आहे. ही बैठक मोदी हटावसाठी नसून कुटुंब बचावासाठी असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यानंतर केद्री रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीही या बैठकीवर मिश्किल टिपण्णी केली आहे.
देवाची आळंदी (ता. खेड, जि. पुणे) येथे मोदी @ 9 या उपक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे शनिवारी (ता. २४) बोलत होते. विरोधकांच्या पाटण्यातील बैठकीनंतरच्या पत्रकापरिषदेत झाली होती. त्यात राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांनी अविवाहित राहुल गांधी यांना लग्न करण्याचा आग्रह धरला. आम्ही वऱ्हाडी म्हणून तयार असल्याचेही मिश्किलपणे ते म्हणाले होते.