शहरातील इंद्रायणी,पवना,मुळा नदीपात्रातील जलपर्णी लवकरात लवकर काढा अन्यथा आयुक्तांना जलपर्णीचा हार घालू – रविराज काळे

0
655

पिंपरी, दि. २४ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड शहरातील इंद्रायणी,पवना,मुळा नदीपात्रातील जलपर्णी काढण्यासाठी थेट पद्धतीने वारंवार कामे दिले आजपर्यंत गेल्या एक वर्षात अंदाजे 8 कोटी रुपयांची कामे थेट पद्धतीने देऊन सुद्धा जलपर्णीचा विळखा शहरातील नद्यांना पडलेला दिसतो .गेले दिड वर्ष महापालिकेचा कारभार प्रशासक म्हणून आपण काम पाहत आहात परंतु आजपर्यंत आपणसुद्धा शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार चालू आहे.आरोग्य विभागामार्फत पूर्वीच्याच ठेकेदारांना पुन्हा काम देण्यात आली होते . मात्र याच ठेकेदारांवर आरोग्य विभागाची मेहरबानी का? याच ठेकदारांवर सतत जलपर्णी वरून आरोप होत असताना कोणतीही निविदा प्रक्रिया न राबवता थेट पद्धतीने काम का दिले का दिले जात होते? आरोग्य विभाग आणि ठेकेदारांचे आर्थिक हितसंबंध जोपासणे एवढेच काम महानगरपालिकेकडून होत होते का? महानगरपालिकेचे बोधवाक्य बदलण्याची हीच योग्य वेळ आहे “कटिबद्ध जनहिताय”बदलून “कटिबद्ध ठेकेदार” हिताय असे जाहीर करावे एवढेच महानगरपालिकेकडून बाकी राहिले आहे.

महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने तिन्ही नदीपात्रातील जलपर्णी काढली जात नाही.आपणसुद्धा ठेकेदाराप्रमाणेच पावसाच्या पाण्याने जलपर्णी पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतून जलपर्णी वाहून जाण्याची वाट पाहत आहात.गेल्यावर्षी आम्ही 15 तरूणांनी मुळा नदीपात्रात उतरून जलपर्णी काढण्यास सुरुवात केली होती आणि तिच जलपर्णी मा.पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना पोस्टाद्वारे पाठवली होती त्यानंतर महापालिका प्रशासनाने जलपर्णी काढण्यास सुरुवात केली होती. ठीक त्याच प्रमाणे यावेळी आठ दिवसांत जलपर्णी काढण्यात आली नाही तर आम्ही आम आदमी पार्टीकडून त्याच जलपर्णीचे तोरण करून महानगरपालिकेच्या गेटला बांधू अन्यथा महानगरपालिका आयुक्त म्हणून आपणास त्याच जलपर्णीचा हार करून घालू असे आम आदमी पार्टीचे युवक शहराध्यक्ष रविराज काळे यांनी सांगितले.