अश्लील एसएमएस, पाठलाग करत महिलेचा विनयभंग करणाऱ्याला अटक

0
477

भोसरी,दि.२३ (पीसीबी) – महिलेच्या व्हाटसअपवर अश्लील मॅसेज पाठवत, तिचा पाठलाग करत विनयभंग करणाऱ्याला एमआयडीसी भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार 3 मे ते 22 जून या कालावधीत भोसरी येथे घडला.

पिडीत महिलेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दिपक भरत हिरडे (वय 30, रा. जुनी सांगवी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी देलिल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या व्हाटसअपवर आरोपीने अश्लील मॅसेज पाठवले. पुढे त्यांचा पाठलाग करत त्रास देण्यास सुरुवात केली. तसेच भेटायला बोलावून फिर्यादीच्या इच्छेविरुद्ध ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे’ म्हणत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.