उधारी मागण्यासाठी गेलेल्या तिघांवर चाकूने वार

0
565

काळेवाडी, दि.२३ (पीसीबी) – उधारीचे पैसे मागण्यासाठी गेलेल्या तिघांवर चाकूने वार करून त्यांना गंभीर जखमी केले. याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी (दि. 22) दुपारी काळेवाडी येथे घडली.

खाजा बागवान, सादिक बागवान, अकबर बागवान, कल्लू बागवान (सर्व रा. चिंचवड. मूळ रा. हिंगोली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी हुसनोद्दीन समादोद्दीन सिद्दीकी (वय 36, रा. थेरगाव. मूळ रा. हिंगोली) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी, त्यांचा भाऊ हबीबोद्दीन आणि साडूचा मुलगा साकेब अन्सारी असे काळेवाडी येथे फळविक्री करणारा आरोपी खाजा बागवान यांच्याकडे उधारी मागण्यासाठी गेले. त्यावेळी आरोपीने फिर्यादी यांना शिवीगाळ करून पैसे देण्यास नकार दिला. खाजा याने त्याच्या साथीदारांना बोलावून घेत आरोपींनी फिर्यादी, त्यांचा भाऊ आणि साडूच्या मुलावर चाकूने वार करून गंभीर जखमी केले. त्यांनतर आरोपी पळून गेले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.