महागाई घटली असल्याचे चित्र खोटे – काशिनाथ नखाते.

0
344

पिंपरी दि.२३ – देशांमध्ये प्रचंड महागाई, बेरोजगारी असताना महत्त्वाच्या खाद्यपदार्थावर लावलेली जीएसटी असो , किराणा, पेट्रोल, डिझेल, सीएनजी, घरगुती गॅस सर्वांचा प्रचंड भाव वाढलेला असताना महागाई घटलेली असल्याचे खोटे चित्र उभे करून जनतेचासरकारवरील रोष कमी करण्याचा प्रयत्न काही मंडळी जाणीवपूर्वक करत आहेत, महागाई कमी झाल्याचे लाभार्थी जाहीर करावेत केंद्र सरकार कडून महागाई घाटल्याचे खोटे चित्र उभे केले जात आहे अशी टीका कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, नॅशनलिस्ट ट्रेड युनियन फेडरेशन, कष्टकरी संघर्ष महासंघ तर्फे प्रसारीत प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की देशातील आणि महाराष्ट्रातील सामान्य जनता महागाईच्या ओझ्याखाली दबलेली असताना देशात कच्च्या तेलाच्या चालू बाजारभावानुसार इंधनाचे दर रोज ठरवले जाण्याची पद्धत होती त्या पद्धतीला केंद्र सरकारने अचानक फाटा दिला आहे जर ही पद्धत रोज सुरू ठेवण्यात आली तर कच्च्या तेलाच्या घसरत्या किमतीचा ग्राहकांना त्वरित प्रत्यक्ष लाभ झाला असता पण जनतेला हा दिलासाही सरकार देऊ शकलेले नाही.

भारतातील घाऊक महागाई निर्देशांक घसरत असून तो मे महिन्यात गेल्या तीन वर्षाच्या निचांकी पातळीवर म्हणजे उणे ३.४८ % इतका आलेला आहे म्हणून महागाई कमी झाल्याचा ढोल वाजवला जात आहे. वास्तविक घाऊक महागाई दर हा संबंधित व्यापारी किंवा खरेदीदारांशी संबंधित असतो घाऊक निर्देशांक म्हणजेच ग्राहक ज्या दराने जीवन आवश्यक वस्तू घेतो त्यावर आधारित जो निर्देशांक असतो तो सीपीआय कमी होत नाही तोपर्यंत ग्राहकांना स्वस्त वस्तू मिळतच नसतात त्यामुळे घाऊक महागाईचा दर कमी झाला म्हणून सरकारच्या समर्थकाने महागाई कमी झाला अशा प्रकारचे खोटे चित्र उभे करणे दिशाभूल आहे. वास्तविक डाळीचे भाव १६० प्रतिकीलो झाले आहेत, कच्च्या तेलाचा घाऊक किमतीचा निर्देशांक उणे २७.०१ % आणि एलपीजी गॅस चा घाऊक निर्देशांक उणे २४.३५ % इतका नोंदवला गेला आहे. म्हणजे गॅसच्या आणि तेलाच्या किमती खाली आल्या असल्या तरी प्रत्यक्ष ग्राहकांना डिझेल, पेट्रोल, गॅस किमतीत सवलत मिळणे अत्यंत गरजेचे असताना तसे झालेले नाही. आपल्या दैनंदिन वापरात येणाऱ्या भाज्यांचा घाऊक निर्देशांक हा उणे २०.१२ % आणि तेलबियांचा घाऊक निर्देशांक उणे १८.७१% असल्याचे सरकारकडून सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात या ग्राहक किंमत निर्देशांक अधिक ३.२९% दाखवतो आहे याचा अर्थ शेतकरी जे मालाचे उत्पादन करतो त्याला घाऊक बाजारात अत्यंत कमी किंमत मिळत असते परंतु याच शेतकऱ्यांचा माल ज्या वेळेला अडत्याकडून अथवा घाउक बाजारातून घेतो त्यावेळेला जास्त किंमत मोजावी लागते किरकोळ स्वरूपात दर कमी होणे गरजेचे असताना महागाई कमी झाल्याचे बोगस चित्र दाखवले जात आहे . सरकारने जनतेमध्ये जाऊन त्यांना प्रश्न विचाराव त्या वेळेला ते नक्कीच कळेल की महागाईने जनता किती होरपळलेली आहे .