व्हीआयपीएस ग्रुप ऑफ कंपनीवर ईडी चा छापा, ३१.७४ कोटी जप्त

0
343

पुणे, दि. २० (पीसीबी) : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) पुणे येथील व्हीआयपीएस ग्रुप ऑफ कंपनीजच्या अहमदाबादमधील कार्यालयावर कारवाई केली. महिन्याभरात दोन वेळा केलेल्या या कारवाईत एकूण 31.74 कोटी रुपये जप्त करण्यात आले. दुसऱ्यांदा अहमदाबादमध्ये मारलेल्या छाप्यात 2 कोटींची रोकड अन 10.38 कोटी रुपयांचा बँक बॅलेन्स जप्त केला आहे. विनोद खुटे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या विरोधात मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीकडून ही कारवाई केली जात आहे.

ईडीने गेल्या महिन्यात कंपनीच्या पुणे आणि अहमदनगर येथील व्हीआयपीएस ग्रुपच्या कार्यालयाची झडती घेतली होती. त्यात 18.54 कोटी रुपयांची बँक बॅलन्स गोठवली होती. या प्रकरणातील आरोपी विनोद खुटे विदेशात फरार झाला आहे. तो VIPS ग्रुप ऑफ कंपनीजच्या माध्यमातून विविध बेकायदेशीर व्यवहार करतो. त्यात क्रिप्टो एक्स्चेंजसह वॉलेट सेवांचाही समावेश आहे. हवालाद्वारे तो परदेशात पैसे पाठवतो. तसेच तो ई-कॉमर्स शॉपिंग पोर्टलद्वारे उत्पादने विकतो.

व्हीआयपीएस ग्रुप ऑफ कंपनीजच्या चौकशीत असे दिसून आले की कंपनी बेकायदेशीर आणि अनधिकृत मल्टी-लेव्हल मार्केटिंग योजना चालवत आहे. या ठिकाणी ग्राहक सदस्य होण्यासाठी योजनेची निवड करतात. कुटे याने काना कॅपिटलच्या ब्रोकरेजमध्ये विविध गुंतवणूकदारांकडून १२५ कोटी रुपयांचा निधी गोळा केल्याचा आरोप तपास एजन्सीने केला आहे.