… म्हणून महिला आमदाराने इंजिनीअरच्या कानशिलात लगावली !

0
230

मुंबई,दि.२१(पीसीबी) – मीरा-भाईंदर येथील महापालिकेच्या कनिष्ठ अभियंत्यास आमदार गीता जैन यांनी चक्क कॉलर धरत कानशिलात लगावल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

दरम्यान या प्रकरणाची संपूर्ण माहिती अशी की, मनपाच्या अभियंत्याने कुटुंब राहत असलेल्या घरावर कारवाई करण्यासाठी पथक पाठवले होते. त्या पथकात मनपाचे अभियंताही सहभागी होते. यामुळे संतपालेल्या आमदार गीता जैन यांनी त्यांची कानउघडणी करत त्याच्या श्रीमुखात भडकवली आहे.

नेमके प्रकरण काय?
आमदार गीता जैन यांनी मीरा भाईंदर महापालिकेच्या ठेक्यावरील कनिष्ठ अभियंता शुभम पाटील यांची कॉलर धरून कानशीलात लगावली. येथील परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबाच्या राहत्या घरावर कारवाई करण्यासाठी या अभियंत्यांच्या नेतृत्त्वात पथक गेले होते. त्यामुळे, पीडित कुटुंबाने आमदार गीता जैन यांच्याकडे धाव घेतली होती. त्यावेळी, आमदार जैन यांनी अभियंत्यास सरकारी नियम आणि माणुसकी शिकवत चांगलाच धडा शिकवला. त्या घरात लहान मुले आहेत, कुटुंब राहात आहे, आणि तुम्ही घर तोडायचे काम करता, तुम्ही माणसे आहात की राक्षस? असा सवाल आमदार जैन यांनी अधिकाऱ्यांना विचारला आहे.

अन् आमदारांना राग अनावर
आमदार बोलत असताना मनपाचे अभियंता शुभम पाटील हे हसत असल्याने आमदार गीत जैन यांच्या लक्षात आले. यावेळी त्यांना राग अनावर झाल्याने त्यांनी थेट कॉलर धरत त्यांच्या थेट श्रीमुखात लगावली. दरम्यान, पावसाळ्यात राहती अनधिकृत घरे तोडू नयेत, असे आहेत शासन आदेश आहेत, असेही त्यांनी यावेळी मनपा अधिकाऱ्यांना सांगितले.