दत्तात्रय भरणे, सिद्धार्थ शिरोळे, सुनील टिंगरे आणि सुनील कांबळे यांच्यासाठी धोक्याची घंटा

0
388

पुणे शहर व जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघातील 2024 च्या निवडणुकीतील कल काय असू शकेल याचा अंदाज . ‘न्यूज एरिना इंडिया’ (News Area India) या सर्व्हे संस्थेने जाहीर केला आहे. या संस्थेने कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा अंदाज व्यक्त करत काँग्रेसला बहुमत दाखवले होते. त्यानंतर आता या संस्थेने महाराष्ट्रातील मतदारसंघ निहाय सर्वेक्षण जाहीर केले आहे. या सर्वेक्षणानुसार भाजप पुन्हा सरकार स्थापन करू शकते असा दावा करण्यात आला आहे.

राज्यात सध्या सर्व्हे वॉर सुरू आहे. जो तो आपापल्या सोयीने या सर्वेक्षणाचे आकडे मांडत आहे. सकाळ आणि साम यांनी केलेल्या सर्वेक्षणानंतर झी न्यूजने आपला सर्व्हे जाहीर केला होता. त्यानंतर आता ‘द न्यूज एरिना’ चा सर्व्हे समोर आला आहे. या सर्व्हेत नुकत्याच झालेल्या कसब्यातील पोटनिवडणुकीत विजयाची पताका फडकवणारे रवींद्र धंगेकरदेखील पराभूत होण्याच्या मार्गावर असल्याचा दावा यात वर्तवण्यात आला आहे.