सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

0
314

चिंचवड, दि. १९ (पीसीबी) – सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरात आत्महत्या केली. ही घटना 11 जून रोजी रामनगर, चिंचवड येथे घडली.

अमित विलास चांदगुडे (वय 40), विलास मधुकर चांदगुडे (वय 65), एक महिला (रा. रामनगर, चिंचवड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. आत्महत्या केलेल्या विवाहितेच्या आईने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जून 2011 मध्ये फिर्यादी यांच्या मुलीचे अमित चांदगुडे याच्याशी लग्न झाले. लग्नानंतर आरोपींनी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून मारहाण केली. लग्नात मानपान केला नाही, सोने दिले नाही असे म्हणत हुंड्याची मागणी केली. दरम्यान, फिर्यादी यांनी आरोपी जावयाला दुचाकी घेऊन दिली. तरीही आरोपींनी फिर्यादी यांच्या मुलीचा छळ केला. या छळाला कंटाळून फिर्यादी यांच्या मुलीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.