चांदेकरवाडी धरणाजवळ सुरु असलेल्या दारूभट्टीवर पोलिसांचा छापा

0
254

शिरगाव, दि. १९ (पीसीबी) – शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत चांदेकरवाडी धरणाच्या जवळ हातभट्टी दारू तयार करण्यासाठी लावलेल्या भट्टीवर शिरगाव पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. ही कारवाई रविवारी (दि. 18) सकाळी करण्यात आली.

असिफ शेख (वय 28, रा. विकासनगर, देहूरोड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार निखील पाटील यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने आढले खुर्द गावात चांदेकरवाडी धरणाच्या बाजूला हातभट्टी दारू तयार करण्यासाठी भट्टी लावली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. यात पोलिसांनी गुळ मिश्रित कच्चे रसायन, गुळाच्या ढेपी व इतर साहित्य असा एकूण 89 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी पळून गेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. शिरगाव पोलीस तपास करीत आहेत.