भरदिवसा मुले घरात एकटी असताना महिलेने थेट घरात घुसून चोरले दागिने

0
297

तळेगाव, दि. १६ (पीसीबी) – घरातील मंडळी कामानिमीत्त घाराबाहेर गेले असताना मुले खटी घरातबघून एका अनोळखी महिलेने घरात घुसून घरातील सोन्याच्या दागिन्यांवरून हात साफ केला आहे. हि घटना तळेगाव स्टेशन परिसरातील वनश्री नगर येथे गुरुवारी (दि.15) दुपारी अडीचच्या सुमारास घडला आहे.

याप्रकरणी नंदकिशोर किशन कावळे (वय 35 रा.तळेगाव) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून एका अनोळखी महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे कामाला घरातून गेले होते. तसेच घरातील फिर्यादी यांची पत्नी व भावजयी देखील मुलांना शाळेतून घरी आणायला गेल्या होया. यावेळी फिर्यादी यांची मुले घरात होती. दरम्यान एक महिला घरात घुसली व तीने मुलाना आई कुठे गेली आहे विचारले असता मुलानी आई शाळेत गेल्याचे सांगितले. त्यावेळी महिलेने घरातील 17 ग्रॅम वजनाचे 50 हजार रुपयांचे सोने चोरून नेले.भरदिवसा ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे घरात मुलांना असे घरात एकटे सोडून जाताना जरा सावधान. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.