माहिती आणि प्रसारण मंत्री अनुरागजी ठाकूर यांच्याकडून चंद्रकांत पाटील यांच्या पत्राची तात्काळ दखल

0
261

आकाशवाणी पुणे केंद्राचे प्रादेशिक बातमीपत्र बंद करण्याच्या निर्णयास दिली स्थगिती

पुणे, दि. १६ (पीसीबी) – पुण्यातील आकाशवाणी केंद्रातील प्रादेशिक वृत्त विभाग बंद करुन त्यावरील बातमीपत्रांचे छत्रपती संभाजीनगरला स्थलांतर करण्याचा निर्णय प्रसार भारतीकडून घेण्यात आल्यानंतर पुणेकरांनी याबाबत नाराजी दर्शविली. त्यानंतर पुणेकरांच्या भावना विचारात घेऊन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तात्काळ याबाबत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्र लिहून सदर निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी विनंती केली आहे. आणि पुणेकरांची भावना लक्षात घेऊन, माननीय अनुराग जी सकारात्मक निर्णय घेतील असा विश्वासही व्यक्त केला होता.

चंद्रकांत पाटील यांच्या पत्राची तात्काळ दाखल घेत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुरागजी ठाकूर यांनी आकाशवाणी पुणे केंद्राचे प्रादेशिक बातमीपत्र बंद करण्याच्या निर्णयास स्थगिती दिली आहे. याबाबत त्यांच्या खात्याकडून एक पत्रक देखील काढण्यात आल आहे.

पुणेकर आणि लोकभावनेचा आदर करुन केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुरागजी ठाकूर यांनी आकाशवाणी पुणे केंद्राचे प्रादेशिक बातमीपत्र बंद करण्याच्या निर्णयास स्थगिती दिली. त्याबद्दल माननीय अनुरागजी ठाकूर यांचे मनापासून आभारी असल्याचं पाटील यांनी ट्विट करून म्हंटल आहे. तसेच सर्व पुणेकरांचे अभिनंदन! देखील करत आकाशवाणी पुणे केंद्राचे प्रादेशिक बातमीपत्र यापुढेही कायमस्वरूपी सुरू ठेवण्यासाठी लवकरच धोरणात्मक निर्णय होईल, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.