कर्नाटकात शालेय पुस्तकातील RSS चा धडा वगळणार

0
188

बंगळुरु, दि. १५ (पीसीबी) : कर्नाटकमध्ये सत्ता आल्यानंतर कर्नाटकातील शालेय पुस्तकातील RSSचे संस्थापक हेगडेवार यांचा उल्लेख वगळण्यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे. कर्नाटकच्या कॅबिनेटनं याबाबत निर्णय घेतला आहे. त्यामुळं आता कर्नाटकात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबतची माहिती शिकवली जाणार नाही.
कर्नाटकचे शालेय शिक्षण मंत्री मधू बंगरप्पा यांनी याबाबत माहिती देताना सांगितल की, कर्नाटक कॅबिनेटनं ठरवलं आहे की शाळेच्या पुस्तकातील रा. स्व. संघाचे (RSS) संस्थापक डॉ. केशव बळीराम हेगडेवार आणि इतरांवरील धडा वगळण्याचा निर्णय घेतला आहे.

शिक्षण मंत्री मधु बंगरप्पा यांनी नुकतचं जाहीर केलं होतं की, विद्यार्थ्यांच्या हितासाठी याच वर्षी शालेय पुस्तकांची समीक्षा केली जाईल. लवकरच ही बाब मंत्रिमंडळासमोर ठेवली मंजुरीसाठी ठेवली जाईल. काँग्रेसनं आपल्या निवडणूक घोषणापत्रात आश्वासन दिलं होतं की. भाजपनं सत्तेत असताना शालेय पुस्तकात केलेल्या बदलांना तसेच राष्ट्रीय शिक्षण धोरण रद्द करण्यात येईल