पुणे नाशिक महामार्गावर अपघात; वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

0
493

मेदनकरवाडी, दि. १५ (पीसीबी) – पुणे नाशिक महामार्गावर आणखी एक अपघाताची घटना समोर आली आहे. यामध्ये अज्ञात वाहनाने धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 13) रात्री साडेआठ वाजताची सुमारास मेदनकरवाडी येथे घडला.

शरद चंद्रकांत महामुनी (वय 55, रा. घरकुल चिखली) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी अक्षय शरद महामुनी (वय 23) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे वडील शरद महामुनी यांचे खेड येथे टेलरिंगचे दुकान आहे. दुकान बंद करून ते मंगळवारी रात्री घरकुल चिखली येथील घरी दुचाकीवरून येत होते. पुणे नाशिक महामार्गाने येत असताना मेदनकरवाडी येथे आल्यानंतर त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. यामध्ये शरद यांच्या हात, पाय आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर अपघाताची माहिती न देता वाहन चालक पळून गेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.