सोमाटणे येथे पाहून लाखांचे ब्राऊन शुगर जप्त

0
386

सोमाटणे, दि. १५ (पीसीबी) – मावळ तालुक्यातील सोमाटणे येथे अमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करत पाऊण लाखांचे शुगर जप्त केले. ही कारवाई बुधवारी (दि. 14) दुपारी करण्यात आली.

नरेश यलप्पा नक्का (वय 33, रा. मुलुंड वेस्ट, मुंबई. मूळ रा. सोलापूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार प्रसाद जंगीलवाड यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमाटणे येथे पुणे मुंबई द्रुतगती मार्गालगत एकजण अंमली पदार्थ घेऊन आला असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून नरेश याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे एक लाख 70 हजार रुपये किमतीचे 34 ग्रॅम ब्राऊन शुगर आढळून आले. पोलिसांनी हे ब्राऊन शुगर आणि 500 रुपये किमतीचा एक मोबाईल फोन जप्त करत नरेश याला अटक केली. शिरगाव पोलीस तपास करीत आहेत.