पाच वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार ; एकास अटक

0
426

तळवडे, दि. १५ (पीसीबी) – खेळणाऱ्या पाच वर्षाच्या मुलीला उचलून नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला देहुरोड पोलिसांनी अटक केली आहे. हा किळसवाणा प्रकार बुधवारी (दि.14) तळवडे येथे एका मंदिराच्या मागे मोकळ्या जागेत घडला आहे.

गणेश किसन चव्हाण (वय 35 रा.तळवडे) असे अटक आरोपीचे नाव असून तो मजुरीचा धंदा करतो. त्याचावर देहुरोड पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची पाच वर्षाची मुलगी हि मंदिरात खेळत होती. यावेळी आरोपीने तिला मंदिरातून उचलून नेले व मंदिराच्या मागे असलेल्या मोकळ्या जागेत नेवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. यावेळी एका महिलेने त्याला या अवस्थेत पाहिले असता तो तेथून पळून गेला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.