महिना लोटला, किशोर आवारे खुनातील सूत्रधार आजही बेपत्ता – मंगळवारपासून बेमुदत उपोषणाचा सुलोचना आवारे यांचा इशारा

0
570

पिंपरी, दि. १२ (पीसीबी) – तळेगाव दाभाडे येथील सामाजिक कार्यकर्ते किशोर आवारे यांची १२ मे रोजी भरदिवसा नगरपालिका कार्यालयासमोर गोळ्या झाडून कोयत्याचे वार करून हत्या कऱण्यात आली. या प्रकरणातील मुख्य सुत्रधाराला गेल्या महिनाभरात पोलिस शोधू शकलेले नाहीत. दरम्यान, जोवर फरार आरोपी आणि मूख्य सुत्रधाराला अटक होत नाही तोवर पोलिस स्टेशन समोर शेकडो कार्यकर्त्यांच्या बरोबरीने बेमुदत उपोषण कऱण्याचा इशारा माजी नगराध्यक्षा आणि किशोर यांच्या मातोश्री सुलोचना आवारे यांनी दिला आहे. मंगळवारी (दि.१३ जून) सकाळी ११ वाजेपासून सर्व कार्यकर्ते उपोषणात सहभागी होणार असल्याचे पत्रक श्रीमती आवारे यांनी काढले आहे.
आवारे यांच्या खून प्रकऱणाला राजकिय वळण मिळाल्याने हे प्रकऱण आता खूप चिघळले आहे. सुरवातीला तालुक्याचे आमदार सुनिल शेळके यांचेच नाव संशयित म्हणून श्रीमती आवारे यांनी घेतले होते. शेळके यांचे बंधू सुधाकरण आणि किशोर यांच्यातील वाद त्यामागे कारणीभूत असल्याचा श्रीमती आवारे यांचा आक्षेप होता. नंतर, पाच आरोपीना अटक कऱण्यात आली. माजी नगरसेवक भानू खळदे यांच्या मुलानेच आपल्या वडिलांच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी सुपारी देऊन हत्या केल्याचे समोर आले.
दरम्यान, माजी नगरसेवक भानू खळदे हेच मुख्य सूत्रधार असल्याचा संशय असून अद्याप ते फरार आहेत. मात्र मुख्य सूत्रधार भानू खळदे असल्याचे लक्षात आल्यानंतरही गेल्या महिनाभरात पोलिसांना खळदे आणि उर्वरित आरोपी सापडू शकले नाहीत. त्यामुळे श्रीमती आवारे यांनी आता समर्थकांसह उपोषणाचा निर्णय घेतला आहे.

खुनाच्या दुसऱ्याच दिवशी आमदार सुनिल शेळके यांच्या समर्थनासाठी मोर्चा काढण्याचाही जोरदार प्रयत्न झाला होता, पोलिसांनी परवानगी नाकारल्याने फक्त शेळके यांच्या घरासमोर लोक जमा झाले होते. तिथेही राजकीय सुडापोटी आमदार शेळके यांना या प्रकऱणात अडकविण्यात येत असल्याचे आरोप अनेकांनी केले. पोलिसांनी या गुन्ह्ह्याच्या तपासासाठी विशेष समिती स्थापन केली. तपास कऱणाऱ्या महिला अधिकाऱ्यांचीच अचानक गडचिरोलीला बदली करण्यात आल्याने या तपासात विशेष कोणतीच प्रगती नाही.

दरम्यान, आवारे यांच्या हत्येनंतर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आवारे यांच्या कुटुंबाची भेट घेतली आणि सांत्वन केले. आता या संपूर्ण प्रकऱणाला भाजप विरूध्द राष्ट्रवादी असा रंग आला असून मूळ प्रकरणाचा तपास भरकटत चालल्याचे आवारे समर्थकांचे मत आहे.