दुचाकीवरून येऊन मोबाईल चोरणाऱ्या चोरांना अटक

0
261

पिंपरी, दि.८ (पीसीबी)- दुचाकीवरून येऊन नागरिकांचा मोबाईल चोरणाऱ्या चोरांना पोलिसांनी अटक केली आहे हा प्रकार रविवारी वाकड येथे घडला.

अजय शेषेराव कसबे (वय 28 रा. ताथवडे) तुकाराम पांडुरंग जाधव (वय 28 रा. ताथवडे) अशी अटक आरोपींची नावे असून वैभव मनोहर पवार (वय 37 रा. थेरगाव) यांनी वाकड पोलिस ठाण्यात बुधवारी(दि.7) फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी सर्विस रोडने पायी चालत जात असताना आरोपी दुचाकीवरून आले व त्यांनी फिर्यादीला हाताने मारहाण करत त्यांचा पंधरा हजार रुपयांचा मोबाईल चोरून नेला होता यावरून वाकड पोलिसांनी दोघांना अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.