विदेश,दि.३०(पीसीबी) – आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभ्या असणर्या पाकिस्तानला त्याचा मित्र देश मलेशियाने झटका दिला आहे. मलेशियाने पाकच्या सरकारी विमान वाहतूक आस्थापनाचे ‘बोईंग ७७७ ’हे विमान जप्त केले. पाकिस्तानने मलेशियाचे कर्जाचे पैसे करत न केल्याने मलेशियाने ही कारवाई केली आहे.
पाकिस्तानी एयरलाईनने हे विमान मलेशियाकडून भाडेतत्वावर घेतले होते. पाकने विमानाचे भाडे न भरल्याने ते मलेशियाची राजधानी कुआलालंपूर येथील विमानतळावर जप्त करण्यात आले. पाकिस्तानने मलेशियाला भाड्यापोटी ३३ कोटी ८ लाख रुपये देणे आवश्यक होते. वर्ष २०२१ मध्येही पाकिस्तानी विमान कुआलालंपूर विमानतळावर जप्त करण्यात आले होते. त्यानंतर पाकने पैसे भरण्याचे आश्वासन दिल्यानंतर मलेशियाने विमान परत केले होते; मात्र त्यानंतरही पाकने पैसे न दिल्याने मलेशियाने आता विमान पुन्हा जप्त केले आहे.