भरधाव दुचाकीच्या धडकेत पादचारी व्यक्तीचा मृत्यू

0
272

दिघी, दि. २४ (पीसीबी) – रस्त्याने पायी चालत जात असलेल्या एका व्यक्तीला भरधाव वेगात आलेल्या दुचाकीने धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या पादुचाऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. 19) रात्री दहा आठ वाजताच्या सुमारास काळेवाडी झोपडपट्टी समोर आळंदी येथे घडली.

प्रदीप वसंत पारवे (वय 33, रा. काळेवाडी झोपडपट्टी, आळंदी) असे मृत्यू झालेल्या पादचारी व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार गणेश कळके यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी दुचाकी चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास फिर्यादी त्यांच्या घरातून आळंदीकडे पायी चालत जात होते. त्यावेळी त्यांना चऱ्होली फाट्याकडून देहू फाट्याकडे जाणाऱ्या एका अनोळखी दुचाकीने जोरात धडक दिली. यामध्ये प्रदीप पारवे गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.