शेअर मार्केट मधील ब्रोकरने घातला 15 लाखांचा गंडा

0
185

चिखली,दि.२२(पीसीबी) – शेअर मार्केटबाबत डी मॅट खाते सुरु करण्यास सांगून ब्रोकरने सुरुवातीला नफा करून दिला. मात्र नंतर तोटा झाल्याचे वेळोवेळी सांगून धमकावून वृद्धाकडून 15 लाख 47 हजार रुपये घेत फसवणूक केली. हा प्रकार 15 फेब्रुवारी ते 15 मार्च या कालावधीत चिखली प्राधिकरण येथे घडली.

चंद्रकांत महादेव फुगे (वय 65, रा. चिखली प्राधिकरण) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संजय पटेल, चेतन भाई आणि दिनेश ठाकूर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संजय याने फिर्यादीस फोन करून तुमचे डी मॅट खाते उघडा. तुमच्याकडे ब्रोकर आहे का, असे विचारले. त्यावर फिर्यादींनी नाही असे सांगितले. संजय पटेल याने चेतन भाई नावाच्या व्यक्तीचा नंबर फिर्यादींना दिला. चेतन याने फिर्यादीस 10 हजार रुपये भरून डी मॅट खाते सुरु करून दिले. सुरुवातीला फिर्यादींना नफा करून दिला. मात्र नंतर तोटा होत असल्याचे वारंवार सांगून फिर्यादीकडून पैसे उकळण्यास सुरु केले. फिर्यादींनी पैसे भरण्यास नकार दिला असता ‘तुमच्या घरी लोक पाठवून पैसे वसूल करू’ अशी धमकी देत फिर्यादीकडून 15 लाख 47 हजार 259 रुपये घेत फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.