किशोर आवारे खून प्रकरणाला नवे वळण, माजी नगरसेवकाचेही नाव

0
195

तळेगाव दाभाडे, दि. २१ (पीसीबी) – जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांच्या हत्या प्रकरणाने नवं वळण घेतलं आहे. माजी नगरसेवक भानू खळदे यांचा मुलगा गौरवने बदला घेण्यासाठी या हत्येचं कट रचल्याचं पोलीस तपासात समोर आलं होतं. मात्र या हत्येमागे गौरवचा प्लॅन नसून खुद्द भानू खळदेचा प्लॅन असल्याचं समोर येत आहे. भानू खळदे यांनीच हा कट रचल्याचा पोलिसांना संशय आहे त्यामुळे आता पोलीस या भानू खळदेचा तपास करत आहे.

मावळ तालुक्यातील तळेगाव नगर परिषदेसमोर जनसेवा विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांचा निर्घृण खून करण्यात आला होता. त्यामुळे संपूर्ण पुणे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. 12 मे रोजी किशोर आवारे यांची हत्या झाली होती. या प्रकरणात पोलिसांनी अगोदर 7 जणांना अटक केलेली आहे. त्यांना आजा न्यायालयाने 25 मे पर्यंत कोठडी सुनावली आहे.

मुलगा गौरवने हा कट रचल्याचं समोर आलं होतं. त्याने हा कट का रचला?, त्यामागचं कारण हे जुन्या नगरपरिषद इमारतीपर्यंत जाऊन पोहोचलं होतं. माजी नगरसेवक भानू खळदे यांच्याविरोधात वृक्षतोड केल्याची तक्रार किशोर आवारे यांनी नगरपरिषदेच्या सीईओकडे केली होती. मात्र बांधकाम साईटच्या मार्गालगतची ही वृक्षतोड परवानगीने होती, असा दावा भानू खळदे यांनी केला होता. मात्र यावरुन आवारे यांनी भानू खळदे यांना सर्वांदेखत कानशिलात लगावली होती. याच अपमानाचा बदला घेण्यासाठी मुलगा गौरव खळदेनी हत्येचा कट रचल्याचं समोर आलं होतं. मात्र आता याच प्रकरणात नवा ट्विस्ट पाहायला मिळत आहे.

भानू खळदे पसार…
सध्या भानू खळदे हा फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. त्यांची चौकशी केली जाणार आहे. भानू खळदे यांच्या कानशिलात लगावल्यानंतर त्यांच्यामुलाने हत्या करुन घेतल्याचं समोर आल्यानंतर कट कसा रचला हे समोर आलं होतं. आवारेंचा गौरवने किशोरचा काटा काढायचं ठरवलं होतं. जानेवारी पासूनच हत्येचा कट रचायला सुरुवात केली होती. मित्र श्यामकडून ही हत्या करुन घ्यायचं ठरलं होतं. आर्थिक मदत करणाऱ्या मित्रासाठी श्यामने होकार दिला होता. श्याम आणि रघु उर्फ प्रवीण धोत्रे सोबत हत्या कशी करायचं हे ठरवलं. श्याम आणि प्रवीणने इतर मित्रांना सोबतीला घेतलं. गेल्या महिन्यापासून रेकी करायला सुरुवात झाली. अखेर नगरपरिषद कार्यालयात किशोर आवारेला गाठण्यात आलं आणि त्यांची हत्या करण्यात आली. मात्र हा कट त्यांच्या मुलाने नाही तर खुद्द भानू खळदे यांनी रचल्याचा संशय आहे.