दोन हजाराच्या नोटा चलनातून बाद ?

0
391

नवी दिल्ली, दि.१९(पीसिबी) – दोन हजार रुपयांच्या नोटा चलानातून बाद होण्याची शक्यता आहे. कारण 2 हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंद होणार आहे. 2 हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंद करण्याचे आदेश RBI अर्थात रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने दिले आहेत. 30 सप्टेंबरपर्यंतच 2 हजार रुपयांच्या नोटा चलनात असणार आहेत. बाजारातील सध्याच्या नोटा वैध असणार आहेत असे देखील रिझर्व्ह बॅंकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

23 मे ते 30 सप्टेंबर या कालावधीत बँकांमध्ये नोटा बदली करता येणार आहेत. एकावेळी जास्तीत जास्त 20 हजार रुपयांच्या नोटा बदली करता येणार आहेत. अप्रत्यक्षपणे 2 हजाराच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.