कारवाई विरोधात फेरीवाल्यांचे हातगाडीसह चक्काजाम आंदोलन, आधी हॉकर झोन मगच कारवाईचा दिला नारा

0
270

पिंपरी दि. 9 – पिंपरी चिंचवड शहरातील अ ते ह सर्वच क्षत्रिय कार्यालयाच्या अंतर्गत आयुक्त शेखर सिंह यांचे आदेशाने मोठ्या प्रमाणात जप्तीची कारवाई करण्यात येत आहे याचा निषेध करत व पथ विक्रेता कायद्याची अंमलबजावणी करा, सर्वांना परवाने व आधी होकर झोन नंतरच कारवाई अन्यथा जेलभारो आंदोलनाचा इशारा देत पिंपरी चिंचवड शहरातील, हातगाडी स्टॉल धारकांनी हातगाडीसह महानगरपालिका कार्यालय गाठून गेट समोर हातगाड्या लावून चक्काजाम आंदोलन केले.

नॅशनल हॉकर फेडरेशन, कष्टकरी संघर्ष महासंघ, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ यांच्या तर्फे कामगार नेते काशिनाथ नखाते यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रदेश संघटक अनिल बारवकर, कार्याध्यक्ष इरफान चौधरी, राजू बिराजदार, गणेश जगताप,राजेश माने, प्रमोद गवई,किरण साडेकर, विठ्ठल कड,राजू खंडागळे, दत्ता जाधव, सागर ठोंबरे, नवनाथ जगताप, सलीम डांगे, विजय दिवटे,सलीम शेख,यासीन शेख,माधुरी जलमुलवर,स्मिता मसुरे, वृषाली पाटणे,अंजु तायडे,मुमताज शेख,जरीता वाठोरे,नंदा तेलगोटे, वहिदा शेख, मंगल कांबळे आदी उपस्थित होते.

मोरवाडी चौकातील अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मोठ्या घोषणा देत शहरातील दापोडी, निगडी,आकुर्डी, पिंपरी, भोसरी,डांगे चौक, काळेवाडी, रहाटणी, घरकुल, चिखली, थरमॅक्स चौक ,रावेत वल्लभनगर ,अशा परिसरातील विक्रेत्यानी मोठ्या संख्येने सहभागी होऊन हातगाड्या घेऊन मोरवाडी चौक ते महापालिका भवन असा भव्य मोर्चा काढत सर्वांना परवाने द्या, सर्वांना स्थिर जागा द्या, अन्यकारक कारवाई त्वरित थांबवा अशा घोषणा देत महापालिका भावना समोर हा मोर्चा आला त्यावेळी महानगरपालिकेच्या गेटवर पूर्ण हातगाड्या लावून या मोर्चाचे सभेत रूपांतर झाले.

यावेळी नखाते म्हणाले की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून एकतर्फी व कायदा झुगारून कारवाई सुरू असून एकीकडे महानगरपालिका सक्ती करून फॉर्म भरून दहा, वीस हजार रुपयांचे कर्ज देत आहे मात्र त्यावर कारवाई करून जप्त करत आहेत असे करता येत नाही मात्र असे केल्यास कर्जे कोण फेडणार ? शहराचा विकास साधताना केवळ श्रीमंतांचा विचार न करता सर्व घटकांचा विचार व्हावा. श्रीमंताच्या चार चाकी गाड्यांना जागा इज्जतीने दिली जाते मात्र फेरीवाल्यांना टार्गेट केले जात आहे हे चुकीचे असून आयुक्तांना फेरीवाला समितिशिवाय कामकाज करू नये.

यावेळी विविध परिसरातून आलेल्या पदाधिकारी यांचे मनोगत झाले त्यानंतर फेरीवाला कायद्याची अंमलबजावणी करा, शहरात सुरू असलेली कारवाई त्वरित थांबवा, व महानगरपालिकेतून कडून नोव्हेंबर – डिसेंबर मध्ये करण्यात आलेले बोगस सर्वेक्षण रद्द करा आणि महानगरपालिकेने स्थापन केलेल्या हॉकर झोनमध्ये सोयी सुविधा द्या व कृष्णानगर चौकातील बेकायदेशीर होकार दोन रद्द करा अशा विविध मागण्यांचे निवेदन घेऊन पोलिसांनी शिष्ठमंडळाला अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांच्याकडे घेऊन जाऊन त्यांचेशी सविस्तर चर्चा केली यावर त्यानी हॉकर झोन करता येईल अशा जागा सुचवव्यात, फेरीवालाबाबत सकारात्मक प्रस्ताव द्यावा, आयुक्त यांचेसोबत येत्या चार दिवसांमध्ये बैठक घेऊन कारवाई शिथिल करून फेरीवाल्यांचा प्रश्न योग्य रीतीने मार्गी लावण्यात येईल आश्वासन दिले. प्रस्तावना शारदा रक्षे यांनी केली तर आभार इरफान मुल्ला यांनी मानले.