किरकोळ कारणावरून तरुणावर कोयत्याने जीवघेणा वार

0
299

चिखली, दि. ०८ (पीसीबी)- इथे का बसला म्हणून भांडणाला सुरुवात करत चार ते पाच जणांनी कोत्याने वार करत जिवघेणा हल्ला केला आहे. याप्रकरणी चिखली पोलिसांनी एक आरोपी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि.5) रात्री आठ वाजता चिखलतील म्हेत्रे गार्डन येथे घडली आहे.

मॉडेल उर्फ विशाल गंजे व तीन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले तर निखील पाटिल याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका अल्पवयीन मुलाने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्याचा मित्र डॉबर उर्फ आदित्य हे बोलत गार्डन जवळ बसले असताना आरोपी तेथे आले व त्यांनी तू इथे का बसला आहेस म्हणत वाद घालण्यास सुरुवात केली. त्यांनी जीवे मारण्याची धमकी देताच फिर्यादी व त्यांचा मित्र तेथून निघू गेले. त्यानंतर पुन्हा फिर्यादी यांना गाठून कोत्याने गळावर वार केले. ते फिर्यादींनी चुकवले. तसेच दहशत पसरवण्यासाठी परिसरात गाडयांची तोडफोड करत नागरिकांनाही दमदाटी केली. आम्ही इसले भाई आहोत. आमच्या मध्ये कोणी यायचे नाही नाही तर मर्डर करून टाकू अशी धमकी दिली. यावरून चिखली पोलीस ठाण्यात आर्म अक्ट, खूनाचा प्रयत्न व दहशत पसरवल्या प्रकरणी गुन्हादाखल करण्यात आला आहे.चिखली पोलीस पुढिल तपास करत आहेत.