राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी निर्णय मागे घ्यावा यासाठी कार्यकर्त्यांची भर पावसात साद

0
175

पिंपरी, दि.२ (पीसीबी)-राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी निवृत्तीचा आपला निर्णय माघे घेण्यात यावा यासाठी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने भर पावसात भावनिक साद घालण्यात आलीय …… साताऱ्यामध्ये जे सभा झाली त्या सभेमध्ये सुद्धा पाऊस आला होता आणि त्या सभेमध्ये पाऊस पडल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर देशाने सुद्धा पाहिले आहे त्या सभेनंतरची काय हवं होती आणि काय बदल झाला त्यामुळे आम्हाला निश्चित असं वाटतंय की या ठिकाणी आजही पाऊस आलेला आहे आणि साहेबांनी जो काही निवृत्तीचा निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाला निश्चितच चांगली दिशा मिळेल.

असे आम्हा सर्व कार्यकर्त्यांना वाटते ह्या पावसातून आम्हाला जाणवते की एक चांगली भूमिका जाणवते की कार्यकर्त्यांच्या नक्कीच मनासारखं घडेल…. असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार असल्याची घोषणा मंगळवारी केली आहे. “लोक माझे सांगाती ” या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात संबोधित करताना शरद पवार यांनी ही घोषणा केली. या निवृत्तीच्या घोषणेनंतर त्याचे तीव्र पडतात राज्यात ठिकठिकाणी उमटत आहेत. या घोषणाचे तीव्र पडसाद पिंपरी चिंचवड शहरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या निवृत्तीच्या घोषणेला भर पावसात कडाडून विरोध केला आहे.